सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ़ शितलकुमार दत्तात्रय जाधव यांची नियुक्ती झाली आहे, तत्पुर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांच्या बदलीबाबत अद्याप तरी प्रतिक्षाच करावी लागणार आहे. दरम्यान, डॉ़ शितलकुमार जाधव हे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कृष्ठरोग) येथे कार्यरत होते, मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्याकडे सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदाची सुत्रे देण्यात आली होती़ दरम्यान, त्यांनी केलेल्या विनंतीनुसार सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णय २९ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला. दरम्यान, त्यांच्यासह राज्यातील अन्य ८ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.