साेलापुर पाेलीस प्रशिक्षण केंद्रात पाेलिस निरीक्षक आहेत नेमणूकिस....!
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
पोलिस वसाहतीत एका महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन पोलिस निरीक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक चंद्रकांत भगवानराव माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका पीडित महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक माने सोलापूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात नेमणुकीवर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने पुण्यात नेमणुकीस होते, त्या वेळी त्यांची पीडित महिलेबरोबर ओळख झाली होती. माने यांनी महिलेला भवानी पेठेतील पोलिस वसाहतीतील घर दाखविण्यास नेले. तेथे महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर माने यांनी महिलेवर बलात्कार केला.
माने यांनी मोबाइल चित्रीकरण करून महिलेस धमकावले. चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देऊन माने यांनी पुन्हा महिलेवर बलात्कार केला. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. माने यांच्या धमक्यांना घाबरलेल्या महिलेने अखेर समर्थ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. समर्थ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.