वृत्तसंस्था // प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या झालेल्या नुकसानींची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना आ.बबनराव शिंदे यांनी संबंधीत तहसीलदार, कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचा-यांना दिल्या आहेत. दोन दिवसापुर्वी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांचे पीकाची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आ. बबनराव शिंदे यांचेकडून सुचना करण्यात आल्या. पिराची कुरोली, वाडी कुरोली , खळवे येथील पाहणीवेळी जि.प.सदस्य रणजितभैया शिंदे यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानींची पाहणी करत उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.काही ठिकाणी नुकत्याच झालेल्या ऊसाच्या लागणी जमीनी वाहून गेल्या आहेत असा नुकसान कारक पाऊस गेल्या वीस वर्षात पडलेला नाही अशी भावना यावेळी शेतक-यांकडून केली गेली आहे. लागोपाट दोन दिवस अगदी ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने माढा पंढरपूर माळशिरस तालुक्यातील अनेक गावात विविध पिकांचे फार मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे काही भागांमध्ये सरासरी पेक्षाही जास्त पाऊस पडलेला असुन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी माढा मतदार संघाचे आमदार बबनराव शिंदे यांनी शासनाकडे केली आहे. चालू आठवड्यात अतिवृष्टीने ऊस, मका, चारा पिके, उडीद ,मूग,फळबागा यासह अन्य शेती पिकांचे तसेच काही ठिकाणी शेत जमिनी वाहून गेल्याने आर्थिक नुकसान झालेले आहे त्यामुळे अतिवृष्टीने झालेल्या हानीचे पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकरी वर्गाला मदत करून दिलासा द्यावा अशा सूचना केल्या. यावेळी रायप्पा हळणवर, दिलीप काळे, मोहन अनपट, अर्जुन काळे, राजेंद्र पाटील, बाळासाहेब कौलगे, कुलदीप कौलगे, किसन कौलग , राजू काळे,प्रवीण सावंत, संतोष कदम, तानाजी चव्हाण, दगडू चव्हाण, आपा कदम,संभाजी थिटे, नागेश उपासे यांचेसह भागातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.