वृत्तसंस्था // प्रतिनिधी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये गळीतास आलेल्या ऊसास कारखान्याने प्र।मे।टन रु।१५००/- प्रमाणे पहिले बील व रु।६००/- प्र।मे।टन प्रमाणे दुसरे बील यापूर्वी शेतक-यांना दिलेले आहे। ऊस बिलाचा तिसरा हप्ता रु।१४७।५४ प्र।मे।टन प्रमाणे संबंधीत शेतक-यांनी मागणी केलेल्या त्यांचे पूर्वीचे बँकेतील खातेवर वर्ग केला असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन मा।समाधानदादा आवताडे यांनी दिली।
आपलेल्या जिल्हयासाठी वरदायीनी ठरलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून तालुक्यातील नद्या, वॅनाॅल, नाले भरुन वाहत असलेने शेतकरी मोठया प्रमाणात ऊस लागवड करताना दिसत आहे। आपले तालुक्यातील सध्या मोठया प्रमाणात पाऊस झाला असून येणा-या सन २०२०-२१ हंगामाकरिता ऊसाचे वाढीसाठी पोषक वातावरण आहे। येणा-या सन २०२०-२१ हंगामाकरिता कारखान्याने ६।०० लाख मे।टन ऊस गाळपाचे उद्दीष्ठ ठेवले असून सर्व ऊस उत्पादक सभासद शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन श्री। समाधान आवताडे यांनी केले आहे। तसेच येणारा हंगाम सर्व संचालक मंडळ, ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कामगार यांच्या सहकार्यातून निश्चितपणे यशस्वी करणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला।
ऊस बिलाबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री। झुंजार आसबे म्हणाले की, शेतक-यांचे सोईनुसार समर्थ सहकारी बँक, बँक आùफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, सोलापूर जिल्हा मध्य।सह।बँक, राजमाता अर्बन बँक, धनश्री पतसंस्था, यशोदा पतसंस्था, बबनराव आवताडे पतसंस्था इ। मंगळवेढा तालुक्यातील बँका, पतसंस्थांचे शाखेमध्ये पूर्वीचे खातेवर ऊस बिलाचा तिसरा हप्ता प्र।मे।टन रु।१४७।५४ प्रमाणे वर्ग केला आहे। तसेच सध्या कोरोना विषाणू संसर्ग असतानासुध्दा कामगारांचे सहकार्याने अडचणीवर मात करुन कारखान्यातील आॅफ सिझनमधील मशिनरी दुरुस्तीची कामे पूर्णत्वाचे मार्गावर आहेत। येणारा हंगाम २०२०-२१ करिता आवश्यक असणारी तोडणी वाहतुक यंत्रणा भरती केली आहे। २५ सप्टेंबर २०२० रोजी बाॅयलर प्रदिपन करुन दि।१० आॅक्टोबर, २०२० पर्यंत कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे। कारखान्याचे चेअरमन मा।समाधानदादा आवताडे, तालुक्याचे नेते मा।बबनराव आवताडे, व्हाईस चेअरमन मा।अंबादास कुलकर्णी व संचालक मंडळाचे मार्गदर्शनानुसार येणा-या हंगामात निश्चितपणे ६।०० लाख मे।टन ऊस गाळपाचे उद्दीष्ठ पूर्ण करणार असलेचे त्यांनी सांगितले। सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ सदस्य, खातेप्रमुख उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.