श्रद्धांजली प्रसंगी आठवणीतून दिला सर्वांनीस्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्याचा आढावा
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
श्रीपुर ता.माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे दुःखद निधन झाले. पांडुरंग परिवारातील,पांडुरंग कारखान्याच्या वतीने कारखान्यातील शेतकरी भवन मध्ये शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली व प्रतिमेला पुष्प अर्पण केले. यावेळी माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे यांनी मोठ्या मालकांच्या आठवणींना उजाळा दिला, दाजी पाटील, हरीशदादा गायकवाड, सुरेश आगवणे, विजय पाटील, प्रकाश केसकर, यांनी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्याचा व आठवणींचा अनुभव आपल्या श्रद्धांजलीपर मनोगता मधून व्यक्त केला. तर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी मोठ्या मालकांचे शेतकऱ्यांविषयी असणारे प्रेम, बैलपोळ्याच्या सणासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पैशाची व्यवस्था केली आहे का? यासाठी दवाखान्या मधून आलेला फोन आणि शेतकऱ्यांविषयीची तळमळ आणि मोठ्या मालकांचे दवाखान्यातील शेवटचे काही क्षण आपले अश्रू ढाळत व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख यांनी मालकानं सोबत असणारा सुरुवाती पासूनचा अनुभव व मला सर्व पदावरती संधी दिली, आपण सर्वांनी मोठ्या मालकांचे वारस जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढची कार्यकीर्द चालवूयात असे भावनिक आव्हान देखील त्यांनी श्रद्धांजलीच्या प्रसंगी सर्व संचालक व कार्यकर्ते यांना केले. यावेळी पांडुरंग कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतराव दौलतराव देशमुख, माजी चेअरमन दिनकरराव अंबादास मोरे, संचालक दिलीपराव त्रिंबक चव्हाण, हरिष भास्करराव गायकवाड, शिवाजी मच्छिंद्र साळुंखे,ज्ञानदेव श्रीरंग ढोबळे, सुरेश राजाराम आगवणे, बाळासोा दादा यलमार, तानाजी मारुती वाघमोडे, महिबुब कमरुद्दीन शेख, नामदेव चिंतु झांबरे, आनंदराव रामदास आरकिले, परमेश्वर बजरंग गणगे, नागनाथ सावता शिंदे,दाजी पाटील, संचालिका संगिता गुलाब पोरे, पार्वती कांतीलाल नरसाळे, तज्ञ संचालक भिमराव नामदेव फाटे , अरुण ज्ञानोबा घोलप व उपस्थित कारखान्याचे अधिकारी वर्क्स मॅनेजर आर.बी.पाटील, चीफ केमिस्ट एम आर कुलकर्णी, केन मॅनेजर एस सी कुमठेकर, चीफ अकाऊंटंट आर. एम.काकडे, मटेरियल मॅनेजर एम.जे. देशपांडे, डेप्युटी चीफ इंजिनियर म.डी.बारटक्के, को जन मॅनेजर एस एस विभुते, डीस्टी. इन्चार्ज एस. ई. शेख, डे.चीफ केमिस्ट एम. एल उपासे, ऊस विकास अधिकारी एस. पी. भालेकर,कॉम्प्युटर इन्चार्ज तानाजी भोसले, सिव्हिल इंजिनिअर एच. एस.नागणे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर एस. वाय. सय्यद,हेड टाईम किपर एस.एन.कदम,कार्यालयीन अधीक्षक भीमराव बाबर, सिक्युरिटी ऑफिसर एम एस घाटुळे, जनसंपर्क व स्थावर ऑफिसर आर. डी. गाजरे तसेच सर्व संचालक मंडळ, अधिकारी,कामगार उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.