पंढरपूर // प्रतिनिधी
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मागील पाच महिन्यापेक्षा जास्त काळापासून संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला होता. सध्याला ऑनलांकची प्रक्रिया सुरू झालेली असून 01 सप्टेंबरपासून मुभा भारतीय जनतेला सरकारकडून देण्यात आलेली आहे.शासकीय खाजगी स्तरावरील अनेक सेवा उद्योग व्यवसाय सध्याला सुरू आहेत.उदा.जसे की विविध
कारखाने,उद्योग बाजार,बससेवा , रेल्वे सेवा दुकाने हॉटेल्स,देशीदारु, बिअर शॉपी,बिअरबार तसेच काही निर्बंधासह काही सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मुभा ही सर्व गर्दीची ठिकाणे खुले करण्यावर सर्व स्तरावर काही अंशी सुरूवात झालेली आहे.
आज देशामध्ये लोक मंदिरे,चर्च , गिरीजाघर,गुरूद्वारा सुरू करण्यासाठी स्वार्थी आंदोलने करत आहेत.मात्र शाळा विद्यालये ,महाविद्यालये बदंच आहेत.यामुळे देशाचे उद्याचे भविष्य असलेली आपल्या पुढच्या पिढीचे शैक्षणिक नुकसान होत आहे.देश जागतीक महासत्ता आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असतांना देशाचे उद्याचे भविष्य विद्यार्थी घरामध्ये डांबून ठेवणे,शाळा बंद ठेवणे.योग्य नाही.जरी जे निर्बंध आरोग्याच्या दृष्टीने आपणास योग्य वाटत असले तरी आजच्या चालू अनलॉक प्रक्रियेतून कोरोना च्या होणा-या प्रार्दुभावामुळे सर्वच जनता विद्यार्थासहीत मुक्तपणे संचार करत आहेत.सुरक्षित अंतर मास्कचा नियमित वापर,काही आरोग्य विषयक निर्बंध लावूनशाळा,कॉलेज,विद्यालय , महाविद्यालयाचे सुरू करावेत . विद्यार्थ्यांचे पर्यायाने राज्याचे देशाचे शैक्षणिक आर्थिक नुकसान न करता काही आरोग्य विषयक बाबींची पुर्तता करून शाळा कॉलेज विद्यालये , महाविद्यालये हे सुरू करण्यासाठी आपण परवानगी द्यावी.अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी सरकारकडे केली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.