वृत्तसंस्था // प्रतिनिधी
येथील १०४ वर्षांच्या वयोवृद्धाने कोरोनासारख्या महाभयंकर रोगावर मात केली आहे. चांगदेव सोपान गाजरे असे त्यांचे नाव आहे.
चांगदेव गाजरे यांना ४ सप्टेंबर रोजी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्यांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यानंतर घेतलेली त्यांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यानंतर एमआयटी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. तेथे त्यांना आॅक्सिजन न लावता कोरोनावर मात केली. चांगदेव गाजरे यांचे वय जास्त असूनही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
ते दररोज पहाटे चार वाजता उठून जनावरांना चारा, पेंड करतात. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या कुटुंबातील ४ पिढ्या पाहिल्या आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबामध्ये १२ व्यक्ती असून ते सहकार शिरोमणी कारखान्याचे माजी संचालक भारत गाजरे यांचे वडील आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.