काँग्रेसचे जेष्ठ नेते कै. रमेश कुलकर्णी यांच्या पुण्यतिथि निमित्त नीलम नगर येथे आरोग्य शिबिरात १५० नागरिकांची तपासणी




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

नीलम नगर येथील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते कै. रमेश कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त युवक काँग्रेस पदाधिकारी सतीष संगा, मनोहर माचर्ला यांच्या वतीने नीलम नगर इंदिरा चौक येथे जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, माजी नगरसेवक विनोद गायकवाड़, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश सालुंखे, दक्षिण विधानसभा युवक अध्यक्ष सैफन शेख, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, यांच्या प्रमुख उपस्थितीत कै. रमेश कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.


यावेळी सोलापूर शहर काँग्रेस पक्ष व सोमपा आरोग्य विभागाच्या सहकार्याने सतीष संगा व मनोहर माचर्ला यांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले डॉ. सहाना मुजावर व त्यांचे सहकाऱ्यांनी या शिबिरात १५० नागरिकांची आरोग्य तपासणी करुण गरजुना औषधे देण्यात आले.

तसेच यावेळी सुनील हरळीकट्टी यांच्या वतीने नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेश महेश्वरम, किरण राठोड, लालू सानी, आनंद मैले, दिनेश रच्छा, राकेश मंथेन, शिवानंद बळोरगी, नारायण गज्जम, बंडू मामा जाधव, सुनील हरळीकट्टी, प्रभाकर सानी, यांच्यासह इतरांनी सहकार्य केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget