वृत्तसंस्था // प्रतिनिधी
येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 या 28 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता कारखान्याचे चेअरमन समाधान महादेव आवताडे यांचे शुभहस्ते व व्हाईस चेअरमन अंबादास चिंतामणी कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली होणार असुन कार्यक्रमानिमित्त सुरुवातीस कारखान्या संचालिका सौ. कविता भारत निकम व त्यांचे पती श्री. भारत सौदागर निकम या उभयतांचे शुभहस्ते सकाळी ठीक 9.00 वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी दिली.
यावर्षीच्या हंगामासाठी कारखान्याच्या मशिनरीची साफसफाई व सर्व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून दररोज 4000 मे.टन ऊस गाळप होईल इतकी ऊस तोडणी यंत्रणा उभी केली आहे.यावर्षी सहा लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यांत आलेले आहे. शेतकयांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या या कारखान्यास ऊस कमी पडणार नाही असा विश्वास कर्तव्यदक्ष चेअरमन समाधान आवताडे यांनी व्यक्त केला आहे.
बॉयलर अग्निप्रदिपन समारंभाचे कार्यक्रमाला कोरोना महामारीचे सावट असल्याने कार्यक्रम साध्या पध्दतीने घेत असल्याचे कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.