अखेर श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी आमदार प्रशांतमालक परिचारक मालक यांची निवड!



सोलापूर // प्रतिनिधी 

संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अग्रेसर अशा राहिलेल्या श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या आज झालेल्या चेअरमन पदाच्या निवडीमध्ये श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार मा. प्रशांत रावजी परिचारक मालक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


आज कारखाना कार्यस्थळावर संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बोर्ड मीटिंगमध्ये हे ही महत्त्वपूर्ण निवड करण्यात आली असल्याचे श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


दिनांक 17 ऑगस्ट रोजी संपूर्ण पांडुरंग परिवाराला व प्रचार कुटुंबियांना सोडून गेलेले आमचे पांडुरंग स्वर्गीय श्री सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर कारखान्याची चेअरमनपदाची धुरा कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते

संपूर्ण साखर कारखान्याच्या संचालक बॉडी मध्ये अनेक ज्येष्ठ संचालक मंडळी कार्यरत आहेत त्यामध्येच स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे व सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक मालक यांचे नाव चेअरमन पदासाठी अग्रेसर होते.

एक महिना सात दिवसानंतर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे या निवडीचे वृत्त समजताच सर्वच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सभासद कामगार व अधिकारी व समस्त पांडुरंग परिवारामध्ये हे एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत साधेपणाने पार पडली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget