मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सांस्कृतिक सेल अधिक मजबूत होणार आहे. असे मनोगत यावेळी व्यक्त केले.
ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रियदर्शन जाधव, कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांचा समावेश आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.