वृत्तसंस्था // प्रतिनिधी
भामरागड तालुक्यातील प्रसिद्ध सेवा केंद्र लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.भेटीदरम्यान जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
आज (ता.०१सप्टेंबर) महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी १०.३० वाजता भामरागड येथे हेलिकॉप्टरने आले,त्यानंतर चारचाकी वाहनाने प्रसिद्ध सेवा केंद्र लोकबिरादरी प्रकल्पात दाखल झाले. जेष्ठ समाज
सेवक डॉ.प्रकाश आमटे यांच्याशी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.यावेळी ज्येष्ठ समाजसेविका डॉ.सौ.मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.दिगंत आमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे, जिल्हाधिकारी दिपक सिंगला,जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनूज जिंदाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रकल्पातील प्राणी अनाथालय, कॉम्प्युटर लॅब,आश्रम शाळा, मुला-मुलींचे वसतीगृह, लोकबिरादरी हॉस्पिटल,इंग्लिश रुम,खेळाचे मैदान,गोटूल,ग्रंथालय, बांबू हस्तकला सेंटर, इत्यादींची पाहणी केली व उपक्रमाची स्तुती केली.तद्नंतर डॉ.प्रकाश आमटे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.१२.३०वाजताचे दरम्यान भामरागडला गेले.त्यानंतर हेलिकॉप्टरने गडचिरोलीकडे प्रस्थान केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.