वृत्तसंस्था // प्रतिनिधी
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरजूंना मास्कचेही वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य व संचालक रणजीतसिंह शिंदे यांनी दिली
आमदार बबन दादा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर यासारखे उपक्रम राबवून अनेककांना जीवदान देण्याचे कार्य करण्यात येत आहे याहीवर्षी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर व मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 2000 रक्त बाटल्या गोळा करून आपण फुल ना फुलाची मदत केली आहे त्याच प्रमाणे 30000 सभासद व इतर लोकांना शनिटायझर चे वाटप करण्यात आले जेणेकरून लोकांचे आरोग्य सुरक्षित रहावे त्यांना रक्ताचा तुटवडा भासू नये त्यांच्यावर योग्य वेळी उपचार व्हावेत सहजासहजी रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करत आलो आहोत आता 1 सप्टेंबर रोजी ही दादांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना स्थळावर रक्तदान शिबिराचे व 30000 मास्क चे वाटप करण्यात येणार आहे दादाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांच्या आरोग्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही रणजित शिंदे म्हणाले यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे उपस्थित होते
चौकट:-
यावेळी आमदार बबनदादा शिंदे म्हणाले गेली सहा महिने कोरोना महामारीने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे त्याला आपला महाराष्ट्रही अपवाद नाही मागील महिन्यापासून ग्रामीण भागालाही कोरोनाने विळखा घातला आहे. सगळे जणजीवन आणि आर्थिक घडी विस्कटलेली आहे ती जागेवर आणण्यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करत आहोत. अशा संकटकाळात वाढदिवस करणे उचित नसल्याने मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही.1 सप्टेंबर रोजी मी बाहेरगावी असल्यामुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्या आप्तेस्ट, मित्र मंडळी, कार्यकर्ते, हितचिंतक, यांना मी विनंती करतो की माझ्या वाढदिवसानिमित्त आपण हार-तुरे पुष्पगुच्छ आणू नयेत आपण आपल्या घरी सुरक्षित राहाल ह्याच माझ्यासाठी आपल्या शुभेच्छा असतील. आपले प्रेम सदैव माझ्यासोबत आहे हे मी जाणतो आहे. त्यामुळे करोणाचे संकट टाळण्यासाठी व जनजीवन पूर्ववत होण्यासाठी आपण सर्वजण मिळून ईश्वराला प्रार्थना करूया

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.