पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव,खर्डी,तनाळी,तावशी,तपकीरी शेटफळ,उपरी,भंटीशेगाव,पळशी,पटवर्धन कुरोली,या भागातील शेतक-यांचे मोठ्याप्रमाणात नुसकान झाले आहे.कालाच्या पावसामुळे या भागातील शेतकयांच्या शेतातील ऊस,द्राक्षे,डांळीब,बोरी,मकवान,मका,अनेक पिकांचे नुसकान झाले आहे.
द्राक्षेवर औषधं फवारणी केलेली पण वाया गेली आहे. त्यामुळे या भागातील शेतकयांच्या शेताची पाहाणी करून त्या शेतक-यांना नुसकान भरपाई देण्यात यावे.कारण शेतकरी शेतीवर आणि आपल्या कुटूंबियाचा उदारर्निवार करतो व अवलंबून आहे. शेततले सर्व पिक वाहून गेलेल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे.
त्याला अडचणीतून बाहेर
काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने तात्काळ पंचनामे सुरू करावे आणि शेतक-यांना आर्थिक सहाय्य मदत लवकर जाहीर करावी. शेतकरी वर्गातून व शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे ईमेल व मेलव्दारे मागणी करण्यात आली.यांचा आपण पूर्ण विचार करून शेतक-यांना न्याय द्यावा.अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.