शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत
पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल, चंद्रभागा व सिताराम महाराज कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत बिले कामगारांचा पगार, ट्रॅक्टर मालकाचे वाहतूक भाडे गेली आणि दिवस झाले तरी दिले नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक बुधवार 23 रोजी तहसील कार्यालय पुढे बेमुदत आंदोलन करण्यात येत असल्याचे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
खर्डी येथील सिताराम महाराज कारखान्यांने 2018-19 मधील शेतकऱ्यांची थकीत बिल अध्याप जमा केले नाही, त्यात बरोबर विठ्ठल सहकारी कारखाने एफ आर पी चा हप्ता कामगारांचा पगार दिला नाही, चंद्रभागा कारखान्याने ही शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे.
शुगर ॲक्ट कायद्यानुसार शेतकऱ्यांचा ऊस गेल्यापासून पंधरा दिवस एफ. आर. पी चा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असते परंतु या कायद्याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे आर. आर. सी च्या नियमानुसार त्वरित कार्यवाही करून कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांना ऊस बिले द्यावीत व या कारखानदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत नलवडे, उपाध्यक्ष व्यंकट रमण देशमुख, जिल्हा युवक उपाध्यक्ष सुरेश नवले, जिल्हा संपर्क प्रमुख माऊली भोसले, तालुकाध्यक्ष सचिन आटकळे, उपाध्यक्ष रमेश लंगोट, आप्पा भोई, बळीराजा शेतकरी संघटनेची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष पंकज देवकते, सचिन कारंडे उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.