(सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व कारखान्याच्या कामगारांनी या आंदोलनात सहभागी व्हावे -अजित बोरकर)
सोलापूर // प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६वाजेपर्यंत श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर या कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत बिल कामगारांचे वेतन व सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचे प्रायव्हेट फंड हे लवकरात लवकर देण्याकरता माळशिरस तहसील कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आहे. तरी सर्व सभासद शेतकरी बांधव कामगार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांनी केलेले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भीमराव फुले, शिवाजीराव चव्हाण, मगन काळे, आनंता मदने, कमलाकर माने देशमुख अमरसिंह माने देशमुख ,अजित कोडग, दत्ता भोसले, मदनसिंह जाधव ,दशरथ मोरे -पाटील, रामदास गायकवाड ,महादेव सावंत, विनोद गाढवे, शिवराम गायकवाड ,पोपट रेडे पाटील, सचिन पवार, सिराज तांबोळी, व प्रसिद्धी प्रमुख श्रीनिवास कदम पाटील उपस्थित होते
श्री शंकर सहकारी साखर कारखाना या कारखान्याकडे ऊस उत्पादक सभासदांचे गळीतासाठी घातलेल्या उसाचे सुमारे तीस कोटी रुपये थकित आहेत. कामगारांचे कोट्यावधी रुपये वेतन अडकून पडलेले आहेत. तरी सर्व त्वरित मिळावे कारखान्याच्या मालकीची जागा जमीन पुणे पंढरपूर पालखी महामार्ग साठी भूसंपादन झालेली आहे. सदरच्या जमिनीच्या मोबदल्यापोटी ५ ते ६ कोटी रुपये शासनाकडे अडकून पडलेले आहेत. त्वरित शेतक-यांना बिलापोटी व कामगारांच्या वेतनाचे पेसै देण्यात यावेत. यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी माजी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर व व संघटनेतील ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी व कामगारांच्या कल्याणासाठी उभे केलेले आहे तरी सर्वांनी यामध्ये जात-पात पक्षभेद आपापसातील मतभेद बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन शेतकरी व कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी हजारोंच्या संख्येने धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करीत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.