राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एॅड. श्रीहरी बागल साहेब यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शेतकर्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी विविध क्षेत्रातील समाजोपयोगी कार्य करणा-या सामाजिक संघनांच्या अडचणी समजून घेऊन सोडविण्यासाठी महाराष्ट्र दौर्यावर असणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. संदीप पवार साहेब व राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांनी दिनांक शनिवार 19- 9-2020 पासून पश्चिम महाराष्ट्र व अनेक ठिकाणी नाशिक, धुळे जिल्ह्यांचा दौरा चालु केला आहे.
महाराष्ट्रत अनेक ठीकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने शेती व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे होऊन ही शेतकरी वर्गाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देणयासाठी व मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे या व अशा विविध प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षांची भुमिका असणार आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण कसे मिळेल यासाठी शांततेने कसे मार्ग निघतील या बद्दल जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे.
कोणतीही अनुचित प्रकार घडु नये.समाजात कायदा व सुव्यवस्था टिकुन राहण्यासाठी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एॅड. श्रीहरी बागल यांनी सांगितले आहे.केंद्र सरकारने कांदा निर्याती वरील बंदी उठवण्यासाठी लेखी नीवेदन नाशीक जिल्हा कलेक्टर यांना देणयात येणार आहे.
यावेळी येवला व परिसरातील शेतकरी वर्गशी चर्चा करण्यात येणार आहे. व स्वच्छता कामगार डॉक्टर वर्गाचे प्रश्न समजुन घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी व अनेक विविध प्रकारचे अडचणी सोडविण्यासाठी महविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणुन कार्यरत असलेला राष्ट्रीय स्वराज्य सेना जिल्हा नीहाय दौरे चालु केले असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष एॅड. श्रीहरी बागल यांनी दिली.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.