उद्या निदान हॉस्पिटल श्रीपुर मध्ये होणार रॅपिड अँटीजेन टेस्ट
कै.ज्ञानोबा सोपान पवार सर यांना महाळुंग ग्रामपंचायतीकडून श्रद्धांजली
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
महाळुंग ता.माळशिरस येथे दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत चालल्यामुळे,प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी ग्राम कोरोना समितीची बैठक महाळुंग ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये पार पडली. गावातील जनतेकडून कोरोना संसर्ग वाढत चालल्यामुळे जनता कर्फ्यू करण्याची व रॅपिड टेस्ट वाढवण्याची मागणी होत होती. या मागणीचा विचार करून शुक्रवार दिनांक 18-9-2020 पासून सलग तीन दिवस 20-9-2020 रात्री बारा पर्यंत जनता कर्फ्यू चे आव्हान करण्यात आले आहे. या बंदच्या कालावधी मध्ये अत्यावश्यक सेवा, मेडिकल व दुध वगळता सर्व दुकाने बंद राहतील. दूध विक्री सकाळी 7 ते 9 पर्यंत सुरू राहील. श्रीपुर मधील निदान हॉस्पिटल व नर्सिंग होम मध्ये (सुमित्रा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे) उद्या शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कोरोना रॅपिड अँटीजेन टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. तरी (को-मॊर्बीड) रुग्णांनी म्हणजेच ज्यांचे वय 60 वर्षांचे वर आहे, ज्यांना टीबी, मधुमेह, दमा, हृदयरोग व गरोदर मातांनी, त्याचबरोबर ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत, डायरेक्ट कोरोना पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने, सर्व नागरिकांनी या कॅम्पमध्ये आपली रॅपिड टेस्ट करून घ्यावी. असे आवाहन महाळुंगचे आरोग्य अधिकारी डॉ.समीर शेख यांनी नागरिकांना केले आहे. तसेच कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास, त्या रुग्णाला, त्याची इच्छा असेल तर त्याच्या घरामध्ये शासनाच्या नियमाचे पालन करून विलगीकरण करून घरी ठेवता येईल असे देखील सांगण्यात आले आहे. तसेच परिसरातील छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, ज्यांना सौम्य लक्षणे आहेत अशा सर्व नागरिकांनी आपली रॅपिड टेस्ट करून घ्यावी असे आवाहन समिती कडून करण्यात आले आहे. यावेळी नोडल अधिकारी वैभव बर्वे, गावचे तलाठी सिद्धनाथ भोसले, ग्राम विकास अधिकारी सुरेश निंबाळकर, नानासाहेब मुंडफणे, सदस्य डॉ. हरिश्चंद्र सावंत-पाटील, विजय भोसले, गोरख मोहिते, भीमराव रेडे, डॉ.समीर शेख, सहाय्यक कृषी अधिकारी बी.पी. शिंदे, तेजस रेडे आदी उपस्थित होते. अती महत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडा, बाहेर जाताना तोंडाला मास्क आवश्यक आहे. सौम्य लक्षणे असल्यास ताबडतोब आपली रॅपिड टेस्ट करून घ्या. डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार घ्या. असे आवाहन आरोग्य विभाग व कोरोना ग्राम कृती समिती कडून करण्यात आले आहे. कै. ज्ञानोबा सोपान पवार सर यांना महाळुंग ग्रामपंचायतीकडून श्रद्धांजली श्रीपुर मधील माजी क्रेडिट सोसायटीचे चेअरमन, माजी महाळुंग ग्रामपंचायत सदस्य, श्री चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळेचे माजी ज्येष्ठ शिक्षक, ज्ञानेश्वर पवार सर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना महाळुंग ग्रामपंचायतीकडून व उपस्थित मीटिंग मधील सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.