वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपाळपूर ता.पंढरपूर येथील दोनशे वर्षे जुन्या असलेल्या नरसिह मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यासाठी लवकरच पंढरपुरात येणार असल्याची माहिती या मंदिराचे जीर्णोद्धाराक राजू खरे यांनी दिली आहे. उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने यांचे सख्खे मावसभाऊ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्य सचिव अनिलकुमार गायकवाड यांचे सख्खे मेहुणे व मूळचे पंढरपूरचे असलेले राजू खरे यांची गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे शेतजमीन व फार्महाउस आहे.या ठिकाणी अतिशय पुरातन असे नरसिह देवतेचे मंदिर आहे.या मंदिराची मोठी महती असून राजू खरे यांनी सदर शेतजमीन खरेदी केल्यानंतर येथील या पुरातन अशा नरसिह मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सोडला होता. या मंदिराचे प्राचीनत्व कायम ठेवत अतिशय चांगल्या पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात आला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नरसिह हे कुलदैवत आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते सदर मंदिराचे कळसारोहन केले जावे यासाठी राजू खरे हे आग्रही होते. त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत देवेंद्र फडणीवस यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास होकार दिला असून या बाबत तारीख व वेळ येत्या दोन तीन दिवसात जाहीर केली जाईल अशी माहिती राजू खरे यांनी दिली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोजक्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.