कारखानदारांनी जाहीर केल्याप्रमाणे ऊसबिले द्यावीत अन्यथा ऊसाचे एकही कांडे गाळपास येऊ देणार नाही:- प्रभाकर देशमुख.



गावोगावी स्पिकर लाऊन जनजागृती करणार 

वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ, फॅबटेक, युटोपियन कारखाना या कारखानदारांनी सन 2019-20 ची वाढीव जाहीर केले पैसे लोकप्रिय दैनिकांमध्ये प्रसिद्ध करून सुद्धा अद्याप  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले नाहीत व श्री संत दामाजी कारखान्याने सन 2019 -20 मध्ये आलेल्या उसाची एफ आर पी मधील राहिलेली रक्कम 147  व त्या मागील हंगामातील 74 रुपये त्वरीत ऊस उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे  अन्यथा येणाऱ्या हंगामामध्ये  संबंधित कारखान्याला उसाचे एकही कांडे येऊ देणार नसल्याचा इशारा प्रभाकर देशमुख यांनी केला.पुढे बोलताना ते म्हणाले की  यामध्ये काही कारखानदारांनी  कारखान्याला ऊस येण्यासाठी एफ आर पी ची पूर्ण रक्कम व वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्या वर जमा केली परंतु दोन महीन्या नंतर ऊस गेलेल्या  बऱ्याच शेतकऱ्यांचे उरलेले पैसे अद्याप शेतकऱ्यांचे खात्यावर जमा केले नाहीत हा चालू असलेला अन्याय कारखानदारांनी त्वरित थांबवून शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे त्वरित खात्यावर जमा करावेत अन्यथा ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर कारखाने चालतात त्याच शेतकऱ्यांमध्ये जनहित शेतकरी संघटना स्पीकर लावून गावोगावी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून आपल्या कारखान्याला उसाचे एक कांडेही गाळपास येऊ देणार नाही व कारखानदारांनी शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव करू नये वेळ आल्यास कारखान्यावर देखील उग्र स्वरुपाचे आंदोलन करू असेही देशमुख म्हणाले. तरी यामध्ये साखर सहसंचालक व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांवर चाललेला अन्याय त्वरित थांबवावा अन्यथा सोमवार दिनांक 28-9-2020 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालय मंगळवेढा येथे लोकशाहीच्या मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन छेडणार असल्याचेही देशमुख यांनी सांगीतले.यावेळी उपस्थित रघु चव्हाण,बिरुदेव ढेकळे, पप्पू दत्तू, बाळासो नागणे, बलभीम माळी, सुखदेव डोरले, सुनील पुजारी, सुखदेव घोडके, आप्पा भुई, शिवाजी जाधव,शिवाजी कांबळे, सर्वेश्वर शेजाळ,मारुती भोरकडे,सुधाकर कांबळे, सिताराम पाटील आदिजन ऊपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget