माझ्या सुनेची आत्महत्या केवळ बचत गटाच्या तगादा लावल्यामुळेच




सासू सुनीता निकम यांनी हंबरडा फोडीत पत्रकार समोर जाहीर कबुली; निराधार झालेल्या आजी नातीला आधार देण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतला पुढाकार

यापुढे महिलांना त्रास देणाऱ्या बचत गट कार्यालय बंद कारणासाठी मनसे अग्रेसर


पंढरपूर प्रतिनिधी:-सध्या महिलांना बचतगट हप्ते वसुलीसाठी तगादा लावला जात आहे.त्यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खूप प्रयत्न केले जात आहेत. अशातच पंढरपूर मधील डाळे गल्ली येथील मनीषा अभय निकम या विधवा तरुण महिलेने मागील काही दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.ती आत्महत्या केवळ महिला बचत गट वसुली वाले यांनी वसुलीसाठी दिलेल्या त्रासामुळेच झाली असल्याची कबुली आज मयत महिलेची सासू सुनीता अरुण निकम यांनी पत्रकार समोर दिली असल्याने महिला मधून संताप व्यक्त केला जात आहे.

    या घटनेमुळे निकम यांच्या घरातील छोटी मुलगी आणि सासू निराधार झाली आहेत.या निराधार आजी नातीला आधार देण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पुढाकार घेतला असून त्या दोघींना दत्तक घेऊन त्यांच्या सर्व आर्थिक खर्चाची जबाबदारी दिलीप धोत्रे यांनी पत्रकार समोर स्वीकारली आहे.


   


 

यापुषढील घटना टाळण्यासाठी आता बचतगट कार्यालयाला टाळे ठोकण्याचा मनसेचा निर्धार: दिलीप(बापू)धोत्रे


सध्या महिलांना त्रासातून मुक्त करण्यासाठी आम्ही मनसे ने मागील चार पाच महिन्यापासून धीर देण्याचे काम चालू केले आहे.तरीही काही मस्तवाल लोक महिलांना घरी जाऊन त्रास देत आहेत.यामुळे आशा घटना घडू लागल्या आहेत. यासाठी महिलांच्या पाठीशी मनसे असल्यामुळे आशा प्रकारे कृत्य करून आपल्या कुटुंबाला पोरके करूं नये.जर कोणी त्रास देत असतील तर त्वरित कळवा आम्ही त्यांचा बंदोबस्त करू असे आवाहन दिलीप धोत्रे यांनी केले आहे.

 याबाबत राज ठाकरे यांना सविस्तरपणे चर्चा करून बचतगट वाल्याचा कायमचाच बंदोबस्त करून हे कर्ज माफी होण्यासाठी आम्हाला आंदोलन उभा करावे लागणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget