पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील करोळे येथे कृषी विद्यापीठ अंतर्गत अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. रेश्मा राजाराम दगडे हिने ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत करोळे गावातील दुध उत्पादक शेतकर्यांना स्वच्छ दुध कसे काढायचे व ते विक्री होईपर्यंत कसे हाताळायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
स्वच्छ दुधामध्ये उपयुक्त जीवाणूची संख्या जास्त असते व अपायकारक जीवाणूची संख्या कमी असते. तसेच स्वछ दुधाची गुणवत्ता जास्त असते. दुध काढण्याआधी हात स्वच्छ धुवून दुध काढले पाहिजे किंवा आधुनिक तंत्रप्रणाली मध्ये मशिनचा वापर करुन दुध काढले तर सडाला इजा होत नाही त्याचबरोबर मनुष्यबळ कमी लागते व वेळीची बचत होते असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला दत्तात्रय दगडे, आप्पासो दगडे, सिताराम दगडे, तुकाराम दगडे तसेच गावातील दुध डेअरी चालक व गावातील दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
या कृषि कन्येला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.डी.पी. कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलवडे ,कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम.एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर. अडत व प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.