राज्यात झपाट्यानं होतोय कोरोनाचा प्रसार; आता मृतांचीही रॅपिड एंटीजन टेस्‍ट होणार



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमणानं हाहाकार निर्माण केला आहे. तर राज्यात १० लाखांपेक्षा अधिक लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे.  आतापर्यंत २९ हजार लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत आता मृतांची एंटीजन टेस्ट करण्याचा करण्याचा निर्णय सरकारने  घेतला आहे. याद्वारे रुग्णालयात दाखल होत असलेल्या प्रत्येक  मृत व्यक्तीची एंटीजन टेस्ट करून त्यावेळी ती व्यक्ती कोरोना संक्रमित होती की नाही हे पाहिलं जाणार आहे. 


सरकारने सध्या टीबीच्या चाचणीसाठीही परवागनी दिली आहे. या टेस्टद्वारे व्यक्तीला कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला होता का, हे पाहिलं जाणार आहे. चाचणीनंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल. देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे शवगृहांमध्ये जागा शिल्लक नाही. ससून सरकार रुग्णालयात एका दिवसात जवळपास ४० ते ५० लोकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे.  दररोज कमीत कमी १५ मृत्यू झालेल्या रुग्णांना त्या ठिकाणी आणलं जातं.


राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात  वेगानं वाढत असलेल्या कोरोना संक्रमण लक्षात घेता  मृतांची एंटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे एका तासात कोरोना संक्रमणाबाबत माहिती मिळवता येऊ शकते. त्यानंतर लगेचच नातेवाईकांकडे मृतदेह सोपवण्यात येईल.  लवकरात लवकर त्याचे अंतिम संस्कार करण्यास मदत होईल.  २१ ऑगस्टला जारी करण्यात आलेल्या एका पत्रात या एंटीजन टेस्टच्या माध्यमातून चुकीचा रिपोर्ट येण्याच्या घटनांबबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. मृत शरीराची ऑटोप्सी केल्यानतर फॉरेंसिक विभागातील कार्मचाऱ्यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता होती. म्हणून आयसीएमआरच्या सल्ल्यानुसार राज्यात फॉरेंसिक ऑटोप्सी बंद करण्याच निर्णय घेण्यात आला होता. 


देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढत आहे. दरम्यान आता कोरोनामुळे बिघडत असलेली परिस्थिती नियंत्रणांत आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पोस्ट कोविड-१९ मॅनेजमेंट प्रोटोकॉल जारी केले आहेत. या प्रोटोकॉलमध्ये रुग्णाच्या रिकव्हरी आणि सामुहिक स्तरावर विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही खास सल्लेही देण्यात आले आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget