बळीराजा शेतकरी संघटनेच्या उपोषणाची दखल घेत उपअभियंता यांनी दिले लेखी आश्वासन!



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

उजनीच्या उजव्या कालव्यावरील गुंजेगाव अहमदाबाद या दोन गावांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाचे नूतनीकरण करणे व बंधारा दुरुस्ती करणे यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीने 15 सप्टेंबर रोजी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता याची दखल घेत भीमा पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब सुरडकर साहेब व शाखा अभियंता कोळवले यांनी उपोषणस्थळी जाऊन बळीराजा शेतकरी संघटनेच्या उपोषणकर्त्यांना त्यांनी दिलेल्या मागण्याबाबत प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात येईल सदरचा प्रस्ताव महाराष्ट् कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्या कार्यालयाच्या सहमतीने सदरचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केला आहे त्यास मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ सदरचे काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.                        तसेच मान नदीवरील गुंजेगाव बंधारा गळती बाबाच्या मागणीसाठी येथील बंधाऱ्याची गलती थांबवण्यासाठी व या बंधाऱ्यात जास्तीत जास्त पाणी थांबून याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल या  संबंधित ठेकेदारांना तात्काळ आदेश दिल्यानंतर व लेखी आश्‍वासनानंतर  हे आंदोलन स्थगित करण्यात आले  यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माऊली हळवणे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, बिराप्पा मोठे सर ढोणे सर मंगळवेढा तालुकाध्यक्ष दामाजी मोरे मंगळवेढ्याचे नेते बापूसाहेब मेटकरी धनाजी गडदे अंकुश गरंडे पंढरपूर तालुका अध्यक्ष तानाजी सोनवले, दत्तात्रय वरपे, नितीन काळे यांच्यासह बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व या परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget