वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मंगळवेढा येथील गणेश विष्णू नवले हत्या प्रकरणातील दोन आरोपींना पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सी एस बाविस्कर यांनी जामिनावर मुक्तता केली असून या दोन आरोपींपैकी एकाचे नाव अक्षय अंकुश शिंदे व दुर्गा उर्फ रमेश तायाप्पा वाघमोडे असे आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी आहे की गणेश विष्णू नवले राहणार पंढरपूर रोड मंगळवेढा याची आर्थिक देवाण-घेवाणी वरून आरोपी रमेश घोडके अक्षय शिंदे दुर्गा उर्फ रमेश वाघमोडे यांनी या सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व विषारी औषध प्राशन करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता म्हणून गणेश नवले यांच्या पत्नीने मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती ती मंगळवेढा पोलीस स्टेशन येथील गु.र.नं 399/2020नुसार भारतीय दंड विधान कलम ३०७,३२३,३४ नुसार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दरम्यानच मारहाण झालेल्या गणेश नवले यांचा उपचारावेळी मृत्यू झाला त्यानंतर या या कलमांमध्ये भा. द. या कलमाची वाढ करण्यात आली होती या वरील सर्व आरोपींनी पंढरपूर येथील सत्र न्यायालयामध्ये हे जामिनासाठी अर्ज केला होता त्यावेळी आरोपीच्या वकिलांकडून असा युक्तिवाद करण्यात आला की मयत गणेश नवले याने पत्नीला वरील तीन माणसांनी मला मारले आहे असे सांगितले होते मग या आरोपींची नावे हे मयत झाल्यानंतर कशी काय निष्पन्न झाली याचा कोणताही ही खुलासा नाही सदर वरील तिन्ही आरोपींचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा समोर दिसत नसल्यामुळे तथात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वरील सर्व आरोपींना जामीन मिळणे आवश्यक आहे त्यामुळे या सर्वांना जामीन मिळावा असा युक्तिवाद यावेळी आरोपींच्या वकिलाकडून करण्यात आला आहे हे सर्व पंढरपूर येथील सत्र न्यायाधीश. सी एस बाविस्कर यांच्यासमोर युक्तिवाद केल्यानंतर त्यांनी आरोपींना 30 हजार रुपयात जामिनावर मुक्तता केली आहे. या संपूर्ण न्यायालय प्रक्रियेमध्ये आरोपींकडून अॅडवोकेट धनंजय हजारे व अॅडवोकेट सुनील खुळे यांनी हे सर्व काम पाहिले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.