16 सप्टेंबर रोजी सातारा येथील प्रतिभा हाँस्पिटल येथे उपचारार्थ होत्या भर्ती
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मराठी, कोंकणी नाट्यस्रृष्टी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी सातारा येथील प्रतिभा हाँस्पिटल येथील कोरोना च्या संसर्गामुळे दुःखद निधन झाले आहे.
अभिनेत्री आशालता यांना कोरोनाची लागण सातारा येथील फलटण तालुक्यात 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान झाली. या मालिकेच्या सेटवर तब्बल 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. प्रकृती बिघडल्यानंतर आशालता यांना 16 सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील वाई येथील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आताच हाती आलेल्या माहितीनुसार, आशालता वाबगावकर त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र पहाटे 4-5 च्या दरम्यान आशालता यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
आई माझी काळुबाई या मालिकेत अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत अभिनेत्री आशालता वाबगावकरांचीही महत्त्वाची भूमिका आहे. साताऱ्याजवळ असलेल्या वाई जवळच्या हिंगणगाव (ता. फलठण) या गावात एका फार्म हाऊसमध्ये या मालिकेचे शुटिंग सुरू होते तिथेच त्यांना मुंबई हुन आलेल्या कलाकारांमुळे कोरोना चा संसर्ग झाला.
आशालता यांच्या गुंतता ह्रदय हे, वाऱ्यावरची वरात, या नाटकातील भुमिका खुपच गाजल्या होत्या. बासु चैटर्जी यांच्या अपने पराए, या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मराठी चित्रपट सृष्टीतील नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी हे गाजलेले उल्लेखनीय चित्रपट आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.