सोलापूर // प्रतिनिधी
श्री प्रकाश यलगुलवार सरांच्या राज्यपाल नियुक्त आमदार ( विधानपरिषद सदस्य) या पदासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी मा. प्रकाश यलगुलवार यांची निवड करावी अशी मागणी आज आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या सोलापूर जिल्हा कोळी समाज संघर्ष समिती आणि अखिल भारतीय कोळी समाज संघटना च्या वतीने करण्यात आले.
मागील ५० वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, कला, नाट्य व क्रीड़ा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर नॅशनल असोसिएशन फ़ॉर द ब्लाइंड या शाखेच्या माध्यमातून अंध, अपंग, मूकबधिर, व बहुविकलांगासाठी सामाजिक बांधीलकी ठेवून या घटकांचे शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या पुनवर्सन करीत आहेत. मा. प्रकाशजी यलगुलवार यांनी सोलापुरात झालेल्या ७१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संयोजन व कार्याध्यक्ष म्हणून हे संमेलन पराकोटिचे यशस्वी केले. त्यातून त्यांची अशा या भव्यदिव्य कार्यक्रम हाताळण्याची सचोटी, अचूक प्रशासन व सर्वाना घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे कसब दिसून येते.
ते महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन चे चेअरमन म्हणून कार्य करीत असताना अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धानचे यशस्वीरित्या संयोजन केले. मा. प्रकाश यलगुलवार यांच्या रचनात्मक क्रीड़ा संयोजनाची दखल घेऊन शासनपातळीवर घेऊन त्यांना महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिव्यांग राज्यस्तरीय क्रीड़ा स्पर्धानच्या आयोजनाची जबाबदारी दिली. १९७९ पासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून कार्यास सुरुवात करुण युवक काँग्रेस अध्यक्ष, सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशी धुरा सांभाळत ते १९८५ ते १९९० या साली सोलापूर शहर दक्षिण मतदरसंघातुन आमदार म्हणून निवडून आले. या कारर्क्रिदित सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदारकीच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत.
मा. प्रकाश यलगुलवार यांच्या कार्याचा आवाका हा कला, क्रीड़ा, साहित्य, नाट्य, दिव्यांग, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, व दिव्यांगाच्या क्षेत्रात आहे. मागील ५० वर्षापासून या क्षेत्रात ते निष्ठेने ते सेवा बजावित आहेत. म्हणून राज्यपाल नियुक्त आमदारकी साठी मा. प्रकाश यलगुलवार यांच्या नावासाठी शिफारस करण्यासाठी कोळी समाजाचे नेते अशोक निंबर्गी सर ,युवा नेते नागेश अण्णा बिराजदार, राज्याचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ कोळी ,राज्याचे प्रवक्ते अंबादास कोळी ,राज्याचे सचिव हणमंत मोतीबने सर, जिल्हा युवक अध्यक्ष रविकुमार यलगुलवार, कर्मचारी नेते अनिल खडाखडे सर, अरुण लोणारी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब कोळी ,संजय संगोळगी ,प्रमोद जमादार ,अप्पू शिरगुर ,रवी बिराजदार सर आदी समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.