वृत्तसंस्था // प्रतिनिधी
महाराष्ट्राभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत चालली आहे. अशातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित आढळून आलं आहे. याबाबत त्यांनी स्वत:च 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना माहिती दिली आहे. बच्चू कडू हे 'न्यूज18 लोकमत'वरील एका चर्चासत्रात सहभागी झाले होते. या चर्चासत्रात आपलं मत मांडत असतानाच बच्चू कडू यांचा कोरोना चाचणीबाबतचा अहवाल आला. त्यानंतर त्यांनी मला व माझ्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.