पंढरपूर // प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांचा पंढरपूर येथे अण्णा धोत्रे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस तर प्रमुख पाहुणे म्हूणन प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची उपस्थिती होती या सत्कार ला उत्तर देताना राज्य सचिव डॉ सुना म्हणाले
पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली अनेक वर्षापासून
पत्रकार संरक्षण कायदा
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्र ना शासकीय जाहिराती मिळणे पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे पाठीमागे घेणे बाबत राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी इत्यादी विषयावर पत्रकार सुरक्षा समिती काम करत असून धमकी मारहाण प्रकरणी अनेक पत्रकारांना न्याय मिळवून दिल्याची माहिती डॉ सुना यांनी या वेळी दिली असून राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले आहे
याप्रसंगी अभिजित तावरे, राजाभाऊ पवार, अक्षय बबलाद, प्रकाश वाळके, आदम बागवान, विनोद धुमाळ, अण्णासो पोपळे, शकील रत्नपारखी, दत्ता गवळी, सिद्धेश्वर बागडे, सुनील धोत्रे, मनोज काळे आदित्य पोपळे, जयवंत मोटे, सिद्धेश्वर गरड उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.