अडचणीत आलेल्या माता भगिणीसाठी मनसे जिल्ह्यात रस्त्यावर

 



 दिलीप धोत्रे यांच्या नेत्रत्वाखाली बचतगट हप्ते माफ होण्यासाठी महिला मेळावे अन मोर्चे

 टेंभुर्णी येथील सर्वच महिलांची मेळाव्याला उपस्थिती


पंढरपूर // प्रतिनिधी

कोरोनाच्या या महामारीत हाताला काम नसल्यामुळे नियमितपणे बचतगट हप्ते वेळेत भरणाऱ्या माता भगिनी आता अडचणीत आल्या आहेत. या परिस्थितीतही वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे आता व्यवसायच बुडल्याने कर्ज भरायचे कसे या चिंतेत असणाऱ्या या महिलांच्या पाठीशी मनसे चे दिलीप धोत्रे यांनी उभे राहन्याचा निर्णय घेतला आहे.


   या बचतगट महिलांनी कर्ज घेताना बचतगट कार्यालयात विमा रक्कम कट करून घेतली जाते. ती विमा सर्टिफिकेक महिलांना त्या कार्यालयाने देण्यात यावी त्यामुळे या महामारीत बुडालेल्या व्यवसायांवर विमा लागू करून ते कर्ज सबधित कंपन्या आणि बँक खात्यात जमा करून नव्याने कर्ज काढून नव्याने व्यवसाय उभा करणे सोपे होणार आहे. त्यासाठी सर्टिफिकेट द्या अन्यथा वसुली माफ करा या मागणीसाठी मनसे चे राज्याचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी जिल्हाभरात महिला मेळावे घेऊन जागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

     या महिला मेळाव्यासाठी महिला हजेरी लावीत असून कुर्डुवाडी नंतर टेम्भुर्णी येथे झलेल्या मेळाव्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला असून कोणीही यापुढे बचतगट हप्ते भरणार नसल्याचा निर्धार यावेळी सर्व महिलांनी केला आहे.

      या मेळाव्यात,मनोज पवार, पत्रकार कुलकर्णी, सौ सरस्वती पवार, यांचेसह मनसे पदाधिकारी आणि टेभुर्णी भागातील महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget