मनसेच्यावतीने नातेपुते येथे रक्तदान शिबिर संपन्न




वृत्तसंस्था // प्रतिनिधी  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नातेपूते येथील पुण्यश्‍लोक  अहिल्यादेवी होळकर सभागृह मध्ये काल भव्य रक्तदान शिबीर भरवण्यात आले होते. महाराष्ट्र कोरोनमुक्त हाच संकल्प "वाढत्या कोरोनाचा पादुर्भाव महाराष्ट्रभर होत असल्याने कोरोनाग्रस्त यांना रक्तपुरवठा मोठया प्रमाणात मिळवा. हा संकल्प महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे. 


 या शिबीराचे आयोजक  महाराष्ट्र नवनिर्माण सेना नातेपुते शहराध्यक्ष पै. रवीभैय्या काळे होते. या शिबिरात रक्तदात्यास हेल्मेट व पाण्याचा जार देण्यात आले गाडी चालवताना  हेल्मेट वापरावे व पिण्याच्या पाण्या करिता जार वापरावा असा संदेश या भेटवस्तूच्या माध्यमातून देण्यात आला रक्तदान शिबिर कार्यक्रमाची सुरुवात  माळशिरस पंचायत समिती सदस्य ज्ञानराज (माऊली) पाटील, अकलूज कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चेे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे युुवक नेते पै. अक्षय भांड, मनसे तालुका संघटक अजित पवार, मनसे तालूका कार्याध्यक्ष मनोज लांडगे, विध्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष अक्षय बावकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बंटीराजे सोरटे, चित्रपट सेना तालुका अध्यक्ष वैभव कुलथे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष निलेश गरगडे, श्री गणेश प्रतिष्ठान अध्यक्ष शेखर अटक, होलार समाज संघटना जिल्हा अध्यक्ष सुनील ढोबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई )गटाचे, सोलापूर जिल्हा सचिव प्रविण वाघमारे व जिल्हा संघटक नारायण पवार आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एकूण ७१ रक्तदात्यानी रक्तदान केले  अक्षय ब्लड बँक सांगोला, यांनी शिबिरास सहकार्य केल्याबाबत त्यांचे व सर्व रक्तदात्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आभार मानले

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget