स्वतःची काळजी घ्या, लक्षणे असल्यास टेस्ट करून घ्या.
महाळुंग-श्रीपुर मध्ये आज आखेर 96 बाधित रुग्ण, पैकी 83 बरे झाले, 13 जण उपचार घेत आहेत.
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
श्रीपूर ता.माळशिरस महाळुंग कोरोना कृती समितीची मीटिंग श्री चंद्रशेखर विद्यालयाच्या पाठीमागे पार पडली. यामध्ये ज्या नागरिकांना कोरोना लक्षणे आहेत, त्यांच्या तपासण्या करणे. ज्या भागांमध्ये कोरोना संसर्ग रुग्ण सापडलेला आहे. त्या ठिकाणच्या तपासण्या करणे. त्याचबरोबर सध्या चिकनगुनिया आणि डेंगू या आजाराचे व लक्षणे असलेले रोगी परिसरामध्ये आढळून आले आहेत.
त्या ठिकाणी व सर्व गावामध्ये जंतुनाशक फवारणी करणे. असे निर्णय घेण्यात आले. माळशिरस तालुक्यातील अकलूज व काही गावे बंद होणार आहेत. परंतु महाळुंग श्रीपुर गावामध्ये सध्या जनता कर्फ्यू नाही, त्यामुळे सद्या गाव बंद राहणार नाही. प्रत्येकाने मास्क घालून घराबाहेर पडावे, किराणा व इतर सर्व दुकानांमध्ये फिजिकल डिस्टनचे पालन करावे. दुकानदाराने ग्राहकांची वहीमध्ये नोंद करून घ्यावी, आवश्यक तेथे सॅनिटायझर चा वापर करावा. अशा प्रकारच्या महत्वपूर्ण सूचना या मीटिंगमध्ये देऊन वरील निर्णय घेण्यात आले. यावेळी महाळुंग गावचे तलाठी सिद्धनाथ भोसले, ग्राम विकास अधिकारी सुरेश निंबाळकर, सहाय्यक कृषी अधिकारी शिंदे, आरोग्य सेवक संजय सपकाळ, नोडल अधिकारी एस.बर्वे, विजय भोसले, डॉ.हरिश्चंद्र सावंत -पाटील, गोरख मोहिते, रमेश देवकर,पोलीस हे.कॉ. स्वरूप शिंदे, शिरीष महाद्वार, संतोष खंकाळ, गणेश कारंडे, दशरथ मोहिते, संभाजी चव्हाण, ऋषिकेश शेठे, सुरज देवडकर, अनिकेत यादव, रूपाली रणे, सुवर्णा कुलकर्णी, सुवर्णा भोसले, ग्रामपंचायत कर्मचारी दत्तात्रय यादव, प्रशांत कुलकर्णी, महादेव पांडुरंग जाधव, विठ्ठल चव्हाण, शिवाजी चव्हाण आणि ग्रामस्थ उपस्थित होते. “ सध्या अकलूज व परिसरामध्ये व्हेंटिलेटर रुग्णांना उपलब्ध नाहीत, बेडची संख्या कमी पडू लागली आहे. सर्व नागरिकांनी स्वतःहून दक्ष राहून स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. लक्षणे दिसल्यास स्वतःहून तपासणी करून घ्यावी. महाळुंग श्रीपुर कोविड सेंटरमध्ये उद्या शुक्रवार दि.11-9-2020 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत मोफत रॅपिड टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे.” - डॉ.भारत गायकवाड, कोविड सेंटर इन्चार्ज

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.