पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

कडब्याच्या टेम्पोमध्ये अवैध रित्या गोवा बनावटीच्या विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर पंढरपूर तालुका पोलिसांनी मुंढेवाडी तालुका पंढरपूर परिसरात कारवाई करून 4 लाख 66 हजार रूपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात करण्यात आली आहे. 


याबाबत सविस्तर वृत्त असे की, 

टाटा माॅझीक टेंम्पो (एम.एच 45 टी-3869) ही हिवरे तालुका माढा येथून 2 लाख 16 हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीच्या 1 हजार 440 क्वार्टरचे (मॅकडाॅल) 30 बाॅक्सची अवैधपणे वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणारा टेंम्पो पकडला.


टेंम्पोची तपासणी केली असता, आत मध्ये आत मॅकडाॅल कंपनीच्या गोवा बनावटीचे 30.दारूचे बाॅक्स आढळून आले. बाॅक्समध्ये 1 हजार 440 क्वार्टर आढळून आल्या.

अवैध दारू वाहतूक प्रकरणी सदानंद दत्तात्रय यादव(रा.घोटी ता.माढा) सज्जन आदिनाथ थोरात(रा.हिवरे ता.मोहोळ)या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टेंम्पोसह 4 लाख 66 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई तालुका पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शानाखाली एपीआय आदिनाथ थोरात,पोलिस काॅन्स्टेबल सुधीर शिंदे,सोमनाथ नरळे यांनी ही धाडसी कारवाई केली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget