ह भ प गुरुवर्य लक्ष्मीनारायणजी दायमा महाराज देवाज्ञा



वृत्तसंस्था प्रतिनिधी

ह भ प गुरुवर्य लक्ष्मीनारायणजी दायमा महाराज (श्याम सुंदर गोरक्षण संस्था पारस अध्यक्ष व विश्व हिंदू परिषद चे सदस्य) आज अकोला येथे रुग्णालयामध्ये अल्पशा आजाराने महाराजांना देवाज्ञा झालेली आहे

      श्री दायमा महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातील एक वाघच म्हणायला काय हरकत नाही आयुष्यभर महाराजांनी गौ सेवा केली आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरिता भागवत कीर्तनाच्या माध्यमातून रात्रंदिवस आपला देह चंदनासारखा झिजवला महाराजांची भाषण शैली अतिशय उत्कृष्ट आणि निर्भीड पद्धतीची होती. श्याम सुंदर गोरक्षण संस्थांमध्ये वारकरी शिक्षण संस्थेचे सुद्धा नियोजन केलेले असून गोरगरिबांचे मुले पारस येथील गौ शाळेमध्ये वारकरी शिक्षण व शालेय शिक्षण घेत होते

     आज महाराज गेल्याने वारकरी संप्रदाय मधील कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे आणि महाराजांच्या भक्त मंडळींवर दुःखाचे फार मोठे डोंगर कोसळले आहे अशा गौ सेवक संत महात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


शोकाकुल-

गुरुवर्य प्रेमनाथ महाराज,अरुण महाराज लांडे, गणेश महाराज शेटे, रमेश महाराज इस्तापे, शिवहरी महाराज इस्तापे, भगवान भाऊ मेटांगे, समस्त पारस वारकरी संप्रदाय भजनी मंडळी, पंचक्रोशीतील भाविक, व सर्ववारकरी संप्रदाय मधील साधक मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget