केंद्र सरकारने शेतकरीवर्गाच्या विरोधात लागु केलेली कांदा निर्यातबंदी उचलावी:- शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी



पंढरपूर // प्रतिनिधी 

देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट आणि तेवढ्यात केंद्र सरकारचे निर्णय काय म्हणावे ह्या सरकारला लॉकडाऊन गोरगरीब,कष्टकरी, शेतमजूर अडचणीत सापडलेला आहे. तरी असे असताना शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे.शेतात खपून मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले.कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येवू लागल्याचे दिसत होते.


चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती.पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक कांदानिर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही कांदानिर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी.अशी मागणी केंद्र सरकारच्या या शेतकरीवर्गाच्या अन्यायी निर्णयाविरोधात शिवस्वराज्य युवा संघटना रस्त्यावर उतरले.गेल्या तीन महिन्यांपूर्वी म्हणजे ४ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा,बटाटा,दाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करुन स्वतःची पाठ थोपटवून घेतली होती. मग तीन महिन्यात निर्णय का फिरवला त्यांनी घेतलेल्या निर्णयाची ते व्यवस्थित अंमलबजावणी करु शकत नाहीत केंद्र सरकारला धोरण लकवा झालेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या वल्गना करतात आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे नुकसान करणारे निर्णय घेतात यातून शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार आहे.शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणार,शेतमालाला दीडपट हमी भाव देणार,शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करणार या केंद्र सरकारच्या फक्त वल्गनाच आहेत, 

हे पुन्हा दिसून येत आहे.बाजारात मागील काही दिवसांत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले असताना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने अचानक निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांनाही मोठा फटका बसणार  आहे.आधीच जवळपास ५० टक्के कांदा सडल्याने नुकसान झालेले आहे परंतु दरवाढ होत असल्याचे आशादायी चित्र बाजारात दिसत असताना मोदी सरकारच्या या लहरी व मनमानी कारभाराने शेतकऱ्यांच्या पल्लवीत झालेल्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.देशाचा विकासदर उणे २४ पर्यंत खाली घसरला आहे. सर्वच क्षेत्रात घसरगुंडी झालेली असताना कृषी क्षेत्राची कामगिरी मात्र समाधानकारक ठरलेली आहे. पंतप्रधानांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून कांद्यावरील निर्यात बंदी उठवून साठवणुकीची मर्यादा रद्द करण्याची मागणी आणि शेतकऱ्यांना चार पैसे जादा कसे मिळतील हे पहावे,असे शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी म्हटले आहे.

सर्व जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget