सोलापूर // प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा येत्या बुधवारी दि.14 ऑक्टोबर रोजी 2020-21 माजी. आ.कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या 15 सहकाऱ्यांच्या हस्ते मोळी पूजनाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
बाळशास्त्री हरिदास, बाळासाहेब बडवे, लक्ष्मीनारायण भट्टड, आनंदराव क्षिरसागर परमेश्वर मस्के घनश्याम काटकर,मारुती देशमुख सीताराम नागणे वसंत पाटील हरी खांडेकर बाळासाहेब गाजरे मल्हारी वाघमारे भिमाशंकर भिंगे बळवंत व्हरगर आणि वसंतराव बंडगर या 15 जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते मोळी पूजन व गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगाम सुरू होणार आहे.
तरी बुधवार दि. 14 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित या कार्यक्रमास सर्व शेतकरी सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख आणि कार्यकारी संचालक डाॅयशवंतराव कुलकर्णी यांनी केले आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.