पंढरपूर तालुक्यातील देवडे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गोरगरीब कष्टकरी समाजातील एका नव तरुण कार्यकर्त्याला आज युवा क्रांती संघटनेच्या युवक तालुका उपाध्यक्ष पदी अभिजीत ज्ञानेश्वर पाटील यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र त्यांना किसान युवा क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते प्रतापसिंह चंदनकर यांनी सुपूर्त केले आहे.
यावेळी अभिजीत पाटील यांनी सांगितले की गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी किसान युवा क्रांती संघटनेच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे तालुक्यात काम करणार असून कुणीही गोरगरीब शेतकरी कुठल्याही शासकीय योजनेपासून वंचित राहू नये याची मी खबरदारी घेणार आहे.
निवड बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच छावा क्षात्रवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष नौशाद शिकलकर, प्रहार संघटनेचे तालुका प्रसिद्धीप्रमुख संभाजी उपासे भाजपाचे रामभाऊ झांबरे आदी सर्व मान्यवर या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.