शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये तर पूरग्रस्त कुटुंबांना 1 लाख रुपयांची नुसकान भरपाई त्वरित द्यावी..!

 





पंढरपूर प्रतिनिधी:-चार दिवसांपासून महाराष्ट्र व इतरत्र चक्रीवादळासह पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच गोरगरीबाच्या घरात महापुराचे पाणी शिरल्यावर मुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेली आहेत. आशा बाधितांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी नेते मा. श्री. संग्राम गायकवाड यांनी केली आहे


तसेच ते पुढे म्हणाले की ,विशेषतः या चक्रीवादळाचा केंद्रबिंदु सोलापूर जिल्हा असल्यामुळे, एरवी पावसाअभावी नुकसान सहन करणाऱ्या जिल्ह्यात प्रथमच पावसामुळे शेतकरी व इतर अनेक सामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

धान्य,फळबागा,ऊस,केली,मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान तर झाले आहेत पण शेतकऱ्यांनी शेतात,घरी काढून ठेवलेली शेतमाल पाण्यात भिजून, काही प्रमाणात वाहून गेला आहे, तर सामान्य लोकांच्या घरामध्ये चार दिवसांपासून पाणी साठल्यामुळे घरातील सामान सडुन गेले आहे तसेच त्यांचे प्रपंच रस्त्यावर आहे आहेत.



श्री संग्राम गायकवाड पुढे म्हणाले की, सरकारी व तांत्रिक वेळ न घालवता केंद्र व राज्य सरकारने यावर त्वरित निर्णय घेऊन, तातडीने लोंकांपर्यंत आर्थिक मदत पोहचवावी अशी विनंती केली आहे. अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशाराही केंद्र व राज्य सरकारला दिला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget