वृत्तसंस्था // प्रतिनिधी :-मंगळवेढा गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे मंगळवेढा तालुक्यातील फळ बागायत शेतकऱ्याचे कधीही नभरून येणार नुकसान झालं आहे तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले व रब्बीच्या पेरणीच दुबार संकट शेतकऱ्यांवर आलं आहे.एकंदरीत विचार केला तर अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी तातडीने मदत देणं गरजेचं आहे. तसेच पंचनामे करत वेळ घालवण्यापेक्ष तात्काळ सरसकट हेक्टरी (५००००)पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी अन्यथा तीव्र व उग्र आंदोलन करू असाइशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले यांनी तहसीलदार राना एका निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, शंकर संगशेट्टी, आबा खांडेकर,इतर पदाधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.