मनसेचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा उस्मानाबाद येथे संपन्न





पंढरपूर // प्रतिनिधी 

उस्मानाबाद जिल्ह्यातील महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या तुळजापूर, उस्मानाबाद, लोहारा सर्व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांना बळकटी मिळावी यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापू) धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी दिलीप (बापू) धोत्रे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. 


यावेळी दिलीप (बापू) धोत्रे पुढे बोलताना म्हणाले की; गाव तिथे शाखा, तिथे कार्यकर्ता, कर्ज देणे, त्याचप्रमाणे वीजबिल माफ करणे, शेतकऱ्यांना कर्ज देणे, बचत गटाचे सर्व कर्ज माफ करणे,नव युवकांना उद्योगासाठी कर्ज देण्यासाठी व पावसामुळे  नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून द्या या व इतर मागण्यांसाठी मनसैनिकांनी रस्त्यावर उतरून सरकारकडे  दाद मागावी त्याचप्रमाणे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना नवे पीक कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करावेत या व अशा इतर मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी लढावे  असे दिलीप (बापू) धोत्रे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले


यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत नावगिरे, उपजिल्हाध्यक्ष अविनाश साळुंखे, महेश जाधव, उमरगा तालुका अध्यक्ष हरिभाऊ जाधव, लोहार तालुका अध्यक्ष अतुल जाधव, तुळजापूर तालुका अध्यक्ष मल्लिनाथ कुंभार, नळदुर्ग शहर अध्यक्ष आलीम शेख आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget