आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर मंडळीचा काँग्रेस पक्षात प्रवेश




सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहर युवक काँग्रेस डॉक्टर सेल च्या वतीने, आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून शहर जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांनीआज रोजी कांग्रेस पक्षात प्रवेश केला, यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, युवक काँग्रेस डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ. अरमान पटेल, दक्षिण विधानसभा युवक अध्यक्ष सैफन शेख, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, संजय गायकवाड़, शरद गुमटे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी डॉ. ऐतेशाम सय्यद, डॉ. राजशेखर घोड़के, डॉ. नासिर सय्यद, डॉ. वासिफ जमादार, डॉ. जयकुमार कस्तूरे, डॉ. प्रकाश माळी, डॉ. रमेश लबडे, डॉ. संतोष सुतार, डॉ. गणेश कुलकर्णी यांच्यासह जवळपास पन्नास डॉक्टरांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की ड़ॉक्टर सेलचे अध्यक्ष अरमान पटेल यांचे कार्य चांगले अतिशय चांगले असुन कोव्हिड काळात जनतेची खुप सेवा केली. अंबादास करगुळे, डॉ. अरमान पटेल, सैफन शेख यांच्या प्रयत्नामुळे आज डॉक्टर मंडळीचा काँग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रम होत आहे. आज आपण सर्वानी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेऊन प्रवेश केलात त्या सर्वांचे अभिनंदन, बहुतांश डॉक्टर राजकरणापासून अलिप्त असतात, कोरोना संकट काळात डॉक्टर मंडळीनी कोरोना संसर्गाचा धोका असतानाही फ्रंटवर  काम करत होते, याबद्दल आपले आभार, आपले कुठलेही अड़चण असु दया आम्हाला सांगा आम्ही त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू तसेच शासन दरबारी सुद्धा आपल्या मागण्या मांडू असे विचार यावेळी आमदार प्रणिती शिंदे व्यक्त केला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget