धाराशिव साखर कारखाना युनिट३ बाॅयलर अग्निप्रदिपान संपन्न.
पंढरपूर // प्रतिनिधी
धाराशिव साखर कारखाना युनिट३,शिवणी ता.लोहा जि.नांदेड येथील सन२०२०-२१ चा दुसर्या गळीत हंगामातचा पहिला बाॅयलर अग्निप्रदिपान समारंभ
दि.महाराष्ट्र राज्य शिखर बॅक नांदेडचे सह. व्यवस्थापक मा. भरत पाटीलसाहेब, मा.वसंत शिंदे, मा. कदमसाहेब, कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक व सर्व संचालक मंडळाच्या शुभहस्ते करण्यात आला.तर मा. साईनाथ ढोणे व त्यांच्या सुविद्य पत्नीच्या हस्ते पुजा संपन्न
कोरोनाच्या काळात कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामे करून कारखाना गाळपास सज्ज केला आहे. यंदा पाऊसकाळ चांगला झाला असून ऊसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाच्या नोंदी कारखान्याकडे द्याव्या. यावर्षी उच्चांक गाळप करून शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देण्याचे घोषित चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.
यावेळी कार्यकारी संचालक व सर्व संचालक, भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव, वाहतूक ठेकेदार आदी मान्यवर व शेतकरी सभासद मोठ्या उपस्थित होते.सांगता समारोप कार्यकारी संचालक अमरजीत पाटील यांनी केले.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.