पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील रणझुंजार असे व्यक्तीमत्व असलेले गणेश (दादा) पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पटवर्धन कुरोली येथील युवकनेते गोपाळराव पाटील मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात आला व गणेश(दादा)पाटील यांना पुढील भावी वाटचालीस गोपाळराव पाटील मित्र परिवार यांच्यावतीने शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी युवकनेते गोपाळदादा पाटील,बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर,जि.प.सदस्य अतुल खरात, शिवाजी नाईकनवरे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर नाईकनवरे, गणेश देशमुख, प्रवीण नाईकनवरे,कपिल कोरके व इतर उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.