पंढरपूर // प्रतिनिधी
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महिला बचत गटाच्या बाबतीत मायक्रो फायनान्स ने जे कर्ज दिले होते ते संपूर्णपणे माफ व्हावे यासाठी दिनांक 29 सप्टेंबर रोजी असा पंढरपूर येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
त्यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती हा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला त्यानंतर या मोर्चाची दखल घेत तिसऱ्या दिवशी पुणे येथील विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी सर्व मायक्रोफायनान्स यांना आपण कोणतीही महिला बचत गटांकडून वसुली करू नये असे सक्त आदेश काढले.
यांचे पडसाद मुंबईपर्यंत उमटले; यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बाप्पू धोत्रे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून मोर्चा काढून सरकारला जाग आणण्याचे ठरवले आहे.
आणि आता याचे लोन मराठवाड्यात सुद्धा गेले आहे. या अनुषंगाने आज लातूर येथे महिला बचत गट भगिनींचा भव्य समोरच्या निघाला होता यावेळी लाखोच्या संख्येने महिला माता भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.
विशेष म्हणजे या मोर्चासाठी महिलांची विराट गर्दी भर पावसात सुद्धा पाहायला मिळाली यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस तथा शाडो कॅबिनेट मंत्री दिलीप (बापू) धोत्रे, मनसे शेतकरी सेना प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे, व मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने, भागवत शिंदे, किरण चव्हाण, फुलचंद कावळे, व असंख्य महाराष्ट्र सैनिक यावेळी मोठ्या संख्येने लातूर येथे उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.