सहकार ही खरी निधर्मी चळवळ, जाती-धर्म पलीकडे जाऊन राबवली पाहिजे - पंतप्रधान मोदी



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

'बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपले जीवन वाहिले होते. लोकांच्या अडचणी दूर करण्याचे काम विखे यांनी केले. मी राजकारणापासून अलिप्त राहिलो. समाजासाठी सत्ता आणि राजकारण पाळलं. राजकारण करत असताना त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी भर दिला' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. यावेळी त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे कौतुकही केले.    प्रवरानगरमध्ये पद्मश्री बाळासाहेख विखे पाटील यांच्या  'देह वेचावा कारणी' आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे ऑनलाइन प्रकाशन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'प्रवरानगर, छत्रपती शिवाजी महाराज तसंच वीर विरांगणा कर्मयोग्यांच्या भूमीला मी वंदन करतो' असं मराठीतून म्हणत भाषणाला सुरुवात करत उपस्थिती मान्यवरांची मन जिंकली.'बाळासाहेब विखे पाटलांचा प्रत्येक राजकीय पक्षांशी संबंध होता. त्यामुळेच बाळासाहेब पाटील यांच्या आयुष्यावर असलेले पुस्तक हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.गाव, गरीब आणि शेतकऱ्यांना विखे यांनी जवळून पाहिले. त्यांनी शेतकऱ्यांना जवळ आणले आणि सहकार क्षेत्राशी जोडले. सहकारी चळवळ ही खरी निधर्मी चळवळ आहे. ती कुठल्याच जातीची आणि कुठल्या ही धर्माची नाही. आतापर्यंत सर्व जाती आणि धर्मांना स्थान दिले आहे' असंही मोदी म्हणाले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget