वृत्तसंस्था // प्रतिनिधी
आधीच कोरोनाच या महाभयंकर रोगाचे संकट असताना वरून अतिवृष्टीमुळे संपूर्णपणे शेतकरी कोलमडून गेला असताना व आर्थिक अडचणीत सापडला असताना आता प.कुरोली येथील विलास महादेव नाईक नवरे यांच्या शेतातील ऊसाला आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली असून यामध्ये त्यांचा सगळा ऊस जळून खाक झाला आहे.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतला आहे. यामुळे सर्व अडचणींनी व्यापलेला शेतकरी जाणार तरी कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील विलास महादेव नाईकनवरे यांच्या शेतातील ऊस पूर्णतः जळून खाक झाला तरी सरकारने लवकरात लवकर या शेतकऱ्यास आर्थिक मदत करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.