सोलापूर // प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील शिरपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सुधाकरपंत परिचारक यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त कारखान्याच्या प्रशासकीय मराठीमध्ये रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिक सन्मान, परिसरातील सर्व डॉक्टरांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
तसेच उसतोडणी कामगारांसाठी 25 खाटाच्या कोविड सेंटरचे उद्घाटन देखील करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभ डाॅ. एम.के. इनामदार यांच्या हस्ते सुधाकरपंत व विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आला. प्रथम पाच साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष आ. प्रशांत परिचारक, माजी अध्यक्ष दिनकर मोरे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. इनामदार, अतुल फडे, निनाद फडे, सुनील बंडगर, बाहुबली दोशी, हरिश्चंद्र सावंत-पाटील, उत्तम खरात, विजय डहाळे, जावेद मुल्ला, सुनील फडे, दादासाहेब पराडे- पाटील, शिवाजी मुंडफणे, संजय वाडेकर, जितेंद्र गायकवाड, आनंद पोखरे, संजय लाटे, भारत गायकवाड, प्रमोद पवार, सुधीर पोफळे, या डॉक्टरांना कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तर हॉस्पिटल मध्ये काम करणारे जगदीश अग्निहोत्री, श्रीकृष्ण पुजारी, सिकंदर डांगे, अजित पवार, प्रशांत सुमंत, हेमंत दीक्षित यांचाही सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये तुकाराम कांबळे, चंद्रकांत उबरेकर, अनिल कुलकर्णी, अशोक पंडित, प्रमोद मदाल या ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मान करण्यात आला. दरम्यान पांडुरंग कारखाना व श्रीयश मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड मजुरांसाठी 25 बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये पाच बेडला व्हेंटिलेटरची सोय आहे. यावेळी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम चे संस्थापक राक्षे यांच्याकडे धान्य देण्यात आले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.