मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महिला बचत गटाचे संपुर्ण कर्ज माफ करण्यात यावे. यासाठी मुंबई येथे गोवंडी येथील लिंबोनी बाग भागातील राहूल सेवा मंडळाच्या हॉलमध्ये भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २८ ऑक्टोबर रोजी बुधवारी सायंकाळी ५वाजता होणार आहे.
मागील सहा ते आठ महिन्यांमध्ये कोणाच्या महाभयंकर संकटामध्ये ते ज्या गोरगरीब व दुर्बल माता भगिनींचे महिला बचत गटाचे हप्ते लोक डॉन मुळे भरले गेले नाहीत अशा सर्व माता भगिनींच्या महिला बचत गटांचे हप्ते व मायक्रोफायनान्सचे माफ करावेत हातावरचे पोट असणा-यांना दररोजचा चरितार्थ चालविणे कठिण झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र मायक्रो फायनान्सच्या कर्ज वसुली अधिकाऱ्यांनी
महिला बचत गटांतील महिलांना कर्ज वसुली साठी तगादा लावून सक्तीने कर्ज वसुली चालुच ठेवली होती. जिथे खायचे वांदे तिथे कसले कर्ज फेडणार? असा गंभीर प्रश्न बचत गटांतील महिलांना पडला होता.ही बाब मनसेच्या सरचिटणीस सौ.रिटाताई गुप्ता,विभाग अध्यक्षा सौ.रंजना ताई गायकवाड व प्रदेश सरचिटणीस मा.दिलीप (बापू) धोत्रे यांच्या लक्षात येताच त्यांनी या महिलांना एकत्र करून मायक्रो फायनान्स व बॅंका यांच्या सक्तीच्या वसुली विरोधात व सरकारने महिला बचत गटांच्या महिलांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.यासाठी पंढरपूर व लातूर येथे महिलांचा महामोर्चा नुकताच काढला होता.याची गंभीर दखल घेऊन पुणे विभागीय आयुक्त यांनी सक्तीची वसुली करू नये याबाबत आदेश काढले.
तरी मायक्रो फायनान्स व बॅंकांनी आपली सक्तीची वसुली सुरूच ठेवली होती. आजून ही बचत गटांच्या अनेक महिलांना कर्ज वसुली करणा-यांचा नाहक त्रास होत आहे या त्रासातून अनेक महिलांना मुक्त करण्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे व प्रमुख मागण्यांसाठी भव्य मेळावा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मनसेच्या सरचिटणीस सौ.रिटाताई गुप्ता,विभाग अध्यक्षा सौ.रंजना ताई गायकवाड,मा. दिलीप (बापू) धोत्रे यांनी यावेळी दिली आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.