मोहेंकर ऍग्रो च्या गळीत हंगामास सुरुवात




(मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप(बापू) धोत्रे यांच्या हस्ते मोळी पूजन)


सोलापूर // प्रतिनिधी 

मोहा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेंकर ऍग्रो या कारखान्याचा दुसऱ्या गळीत हंगामाची सुरुवात मनसेचे प्रदेश सरचिटणीस, शाॅडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते   कारखान्याचे चेअरमन हनुमंत तात्या मडके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले,,

यावेळी बोलताना दिलीप(बापू) धोत्रे म्हणाले की संपुर्ण महाराष्ट्रात आदर्शवत असा हा कारखाना असून कारखान्याचा हा दुसरा गळीत हंगाम आहे,, पहिल्या वर्षीच फायद्यात असणाऱ्या या कारखान्याने सर्व शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे दिले आहेत,

चेअरमन हनुमंत मडके यांचे नियोजन कौतुकास्पद असून या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी कारखान्याची उभारणी केली आहे,

यावेळी चेअरमन हनुमंत तात्या मडके म्हणाले की या भागातील एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही त्याच बरोबर इतर कारखान्या प्रमाणे आम्हीही आपल्याला यावर्षीही चांगला दर देऊ, या भागातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक नवीन उद्योग उभा करण्याची घोषणा हनुमंत (तात्या) मडके यांनी केली,, यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापू) धोत्रे यांच्या हस्ते बॉयलरचे ही पूजन करण्यात आले,, यावेळी कार्यकारी संचालक संतोष मडके, मोहेंकर मल्टी स्टेट चे कार्यकारी संचालक विशाल मडके, संचालक बापूराव शेळके,आनंद बलई शेठ, मोहाचे उपसरपंच सोमनाथ मडके, अनंत मडके, संजय मडके, प्रमोद मडके, धनंजय मडके,जोशी, अरकडे सर,कारखान्यातील सर्व कर्मचारी, शेतकरी सभासद इत्यादी उपस्थीत होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget