सोलापूर // प्रतिनिधी
संपूर्ण जगात कोरोना या जीवघेण्या आजाराने धुमाकूळ घातला असून त्याचे मोठया प्रमाणात पडसाद महाराष्ट्र राज्यात उमटले असून कोरोना या रोगाला रोखण्यासाठी राज्य सरकार विविध प्रकारचे उपाययोजना करत असून पोलीस प्रशासन महसूल प्रशासन संचार बंदी जमाव बंदी मास्क वापरणे अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापरणे इत्यादी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी वेगवेगळे उपाय योजना करत असून याबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार कोरोना रोगाबाबत जनतेला केलेले आदेश निर्देश सूचना बाबत राज्यातील अनेक पत्रकारांनी आपले राष्ट्रीय कर्त्यव्य समजून कुटूंबाला बाजूला सारून व आपला जीव धोक्यात घालून बातम्या केलेल्या असून याच काळात वार्तांकन करत असताना राज्यातील काही पत्रकारांना कोरोना सारखा गंभीर आजार होऊन अनेक पत्रकारांचे दुर्दैवी निधन झाले असून पत्रकारांचे अनेक कुटूंबे उध्वस्त झालेली आहेत अश्या पत्रकारांच्या वारसाला शासकीय सेवेत सामावून घेण्याची पत्रकार सुरक्षा समितीने मुख्यमंत्री यांना साकडे घातले असून सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे
मुख्यमंत्री महोदय आपण देखील दैनिक सामना वृत्तपत्र चे कार्यकारी संपादक म्हूणन काम केले असून पत्रकारांच्या व्यथा वेदना अडचणीत आपण समजू शकता त्यामुळे निधन पावलेल्या पत्रकारांच्या कुटूंबाला आपण आर्थिक मदतीबरोबर च वारसाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी केली आहे
याप्रसंगी शहर अध्यक्ष अरुण सिदगिड्डी संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार, उपाध्यक्ष प्रभाकर एडके, इम्तियाज अक्कलकोटे, बिपीन दिड्डी अन्सर तांबोळी भास्कर अल्ली, राकेश वरम, नयन यादवाड, अक्षय बबलाद डॉ रवींद्र सोरटे, इस्माईल शेख, समर्थ सोरटे, नागेश बंदी श्रीशैल म्हेत्रे, श्रीनिवास पेद्दी, अशोक माचन, रवी कंदीकटला, मिलिंद भिसे, सतीश गडकरी, प्रसाद ठक्का, दत्तात्रय गांगजी, मोहंमद इंडीकर सह अनेक पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.